करमाळ्यात तिरंगा रॅलीत देशभक्तीचा जल्लोष – गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आयोजन

करमाळा : स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी करमाळा शहरात आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली भाजप संपर्क कार्यालयातून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त झाली.

रॅलीदरम्यान मार्गावरील महापुरुषांचे पुतळे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज – यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय भवानी जय शिवाजी” अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

रॅलीत महिला, युवक तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. विशेष आकर्षण ठरले ते कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींचे पारंपरिक लेझिम सादरीकरण, ज्याने उपस्थितांचे मन मोहून टाकले. यावेळी गणेश चिवटे यांनी भाषणात सांगितले की, “तिरंगा हा केवळ ध्वज नसून तो आपल्या स्वातंत्र्य, बलिदान आणि एकतेचे प्रतीक आहे. युवकांनी हा राष्ट्रभक्तीचा दीप सदैव तेजस्वी ठेवावा.” रॅलीदरम्यान रस्त्याच्या कडेला उभे राहून नागरिकांनी तिरंग्याला सलामी दिली, तर व्यापाऱ्यांनी फुलांनी व पताकांनी स्वागत केले. या उपक्रमामुळे करमाळा शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच वृद्धिंगत झाला.

या रॅलीसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, नितीन झिंजाडे, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, सोमनाथ घाडगे, जयंत काळे पाटील, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, भैय्याराज गोसावी, हर्षद गाडे, प्रदीप देवी, बंडू शिंदे, विष्णू रंदवे, विजय भांडवलकर, सचिन गायकवाड, गणेश माने, प्रवीण शेळके, सचिन कानगुडे, जयसिंग भोगे, वसीम सय्यद, बापू मोहोळकर, राजू पवार, तुकाराम भोसले, श्रीमंत पाटील, चंद्रशेखर सरडे, कपिल मंडलिक, राजू सय्यद, रंजीत पवार, संगीत नष्टे, राजश्री खाडे, चंपावती कांबळे, प्रमोद पाटील, सुनील नेटके, कल्याण नवले, पंकज बिचितकर, किरण बागल, राजेश पाटील, बापू लोंढे, दीपक गायकवाड, अशोक मोरे, संदिप रेगुडे, गणेश वाळुंजकर, वसुदेव पवार, प्रवीण बिनवडे, निलेश राख, काकासाहेब थोरवे, संदीप काळे, ईश्वर मोरे, तुषार जाधव, दत्ता एकाड यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

