लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पोळ यांची बिनविरोध निवड -

लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पोळ यांची बिनविरोध निवड

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) :
लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल सहकारी नागरी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी गजेंद्र पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत गजेंद्र पोळ यांच्यासह गोरख काकडे, जलाल पटेल, अमोल दौंडे, दत्तात्रय बारवकर, तात्या बागल, सारिका ठोसर, शैला भोसले, शरद जगताप, लक्ष्मण खोमणे आणि विकास भोसले यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

तालुका उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत अध्यक्षपदी गजेंद्र पोळ तर सचिवपदी लक्ष्मण खोमणे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उमेश बेंडारी यांनी काम पाहिले.

निवडीनंतर माजी आमदार शामलताई बागल यांच्या हस्ते अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक गणेश झोळ, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी कदम, सतीश अनपट, बबलू कांबळे, अनिल पवार, प्रविण यादव, अनिल वायकर, मोहन यादव, सुरज काळे, गणेश अंधारे तसेच मकाई कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!