करमाळा शहरातून घरासमोरून दुचाकीची चोरी..

करमाळा : शहरातील कृष्णाजी नगर परिसरात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे.
यात डाॅ. ओंकार विलास शिराळ (वय 27,रा. कृष्णाजी नगर, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, हिरो कंपनीची पॅशन मोटारसायकल क्र. MH-13-AQ-0591 ही दुचाकी 9 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता घरासमोर हॅण्डल लॉक करून उभी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पाहिले असता गाडी जागेवरून गायब होती. परिसरात व करमाळा शहरात शोध घेतला, पण ती कुठेच मिळाली नाही, म्हणजे ही मोटारसायकल चोरीस गेली आहे. चोरीस गेलेली गाडी लाल रंगाची असून त्यावर काळा पट्टा आहे. किंमत सुमारे 60 हजार रुपये आहे. अज्ञात चोरट्याने हॅण्डल लॉक तोडून ही दुचाकी चोरली आहे. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



