पारेवाडीत महिलेला जातीयवाचक शिवीगाळ- गुन्हा दाखल

करमाळा: पारेवाडी येथे झाडे उखडून टाकल्याप्रकरणी व जातीयवादी शिवीगाळ केल्याबाबत एका महिलेनं करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यात पल्लवी राहुल टोणपे (वय 29, रा. पारेवाडी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या घरासमोर असलेल्या शासकीय जागेत सावलीसाठी आम्ही झाडे लावली होती. दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गावातील पांडुरंग तुकाराम नवले हा जेसीबी लावून झाडे काढत होता. यावेळी मी विरोध केला असता, नवले यांनी तुच्छ वागणूक देण्याच्या हेतूने गावातील इतर लोकांसमोर माझा अपमान करून जातीयवादी शिवीगाळ केली.
या प्रकरणी करमाळा पोलीसांनी 12 ऑगस्ट ला गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.




