शेलगाव येथे कंटेनरच्या धडकेत पिंटू केकाण यांचा मृत्यू... -

शेलगाव येथे कंटेनरच्या धडकेत पिंटू केकाण यांचा मृत्यू…

0

करमाळा  : शेलगाव (वा.) (ता.करमाळा) परिसरात मंगळवारी (दि. ८ ऑगस्ट) रात्री झालेल्या अपघातात बापूराव उर्फ पिंटू श्रीरंग केकाण (वय ४५, रा. शेलगाव वांगी) यांचा मृत्यू झाला आहे.

फिर्यादी विशाल हरिचंद्र केकाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास शेलगाव चौकात पिंटू केकाण आपल्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनर (क्रमांक केए-४२ बी-३६२३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. डोक्याला तसेच कान-नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गावकऱ्यांनी तात्काळ अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरला अडवले. जखमी पिंटू केकाण यांना प्रथम जेऊर येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार शेलगाव येथे पार पडले. कंटेनर चालकाबाबतची माहिती अद्याप मिळालेली नसून करमाळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!