अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती सुरु - २५ ऑगस्टपर्यंत मुदत -

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती सुरु – २५ ऑगस्टपर्यंत मुदत

0

करमाळा (प्रतिनिधी) – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, करमाळा (ग्रामीण) अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प करमाळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज स्वीकारण्याची सुरुवात ११ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत आहे.

भरतीसाठी उपलब्ध पदे:

पात्रता अटी पुढीलप्रमाणे :

एक महसुली गावातून १ अंगणवाडी सेविका व सात महसुली गावांतून ७ अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्जदार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल ३५ वर्षे असावे; तर विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रतेसाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., एमएस-सीआयटी इत्यादी उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच विधवा, अनाथ, जातीय प्रमाणपत्रधारक उमेदवारांना गुणांकनाच्या स्वरूपात विशेष प्राधान्य राहील.

स्थानिक महिला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, करमाळा येथे ११ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!