सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा (दि.२६): करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने पं. कै. के. एन. बोळंगे व पं. कै. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत-नृत्य महोत्सव साजरा करण्यात करण्यात आला.
या सोहळ्यात कोलकाता, गुवाहाटी, नेपाळ व श्रीलंका येथील दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत व नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध कलाकारांचा सुरताल पुरस्काराने गौरव करण्यात आला.


यावेळी पुढील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले –
- पं. सुदर्शन राजोपाध्याय (नेपाळ – सरोद) : सुरताल संगीत शिरोमणी पुरस्कार
- डॉ. दुमिथा गुणवर्धन (श्रीलंका – कथक) : सुरताल नृत्यभूषण पुरस्कार
- श्रीमती बंदना बरूआ (गुवाहाटी – सत्रीय नृत्य) : सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार
- तन्नी चौधरी (कोलकाता – कथक) : सुरताल नृत्य कलानिधी पुरस्कार
- डॉ. महेंद्र नगरे (करमाळा – प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ) : सुरताल करमाळा भूषण पुरस्कार


पुरस्कारप्राप्त मान्यवरांना यशकल्याणी सेवाभावी संस्था तर्फे विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पैठणी देऊनही गौरविण्यात आले.

या सोहळ्याला तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, श्रद्धा जवजांळ, गणेश करे पाटील, कन्हैयालाल देवी, लक्ष्मण केकान, श्रेणिक खाटेर, डॉ. कविता कांबळे, प्राचार्य मिलिंद फंड, नगरसेवक महादेव फंड, अतुल फंड, सुनील सावंत, नगरसेवीका संगीता खाटेर, समाधान आवताडे, पत्रकार दिनेश मडके, शीतलकुमार मोटे, सिद्धार्थ वाघमारे, प्रकाश शिंदे, अजित कणसे, डॉ महेश वीर , डॉ महेश अभंग, विजय खंडागळे, खांडेकर सर, कुलकर्णी सर, गंगणे सर प्राध्यापक फाटक सर, शिवराज चिवटे आदी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यांच्यासह बीड, लातूर, बारामती, सोलापूर, पुणे इथून आलेले मान्यवर व रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे म्हणाले की, “बाळासाहेब नरारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करमाळा तालुक्याचे नाव देशभर पोहोचवले आहे.” तर नवभारत स्कुलच्या संचालिका सुनिता देवी म्हणाल्या की, “संगीत ही माणसांना एकत्र आणणारी अद्वितीय कला असून सुरताल विद्यालयाचा महोत्सव खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बरडे, संतोष पोतदार, दिगंबर पवार, निलेश कुलकर्णी, सुहास कांबळे, सतीश वीर, नवनाथ थोरात, आबा साने, उमेश मगर यांनी विशेष मेहनत घेतली. प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले, सूत्रसंचालन रेश्मा जाधव, संध्या थोरे व अर्चना सोनी यांनी तर आभार प्रदर्शन शिंदे यांनी मानले.
