ग्रंथालयांना बळकटी देण्यासाठी कटिबद्ध – आमदार नारायण पाटील

करमाळा(प्रतिनिधी):”करमाळा तालुक्यातील प्रत्येक ग्रंथालय टिकून राहावे, नवनव्या वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दिली.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार पाटील यांनी गेल्या वर्षभरात तालुक्यातील ५० ग्रंथालयांना दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती देत, पुढील काळात दरवर्षी अशाच स्वरूपाचा निधी देण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रमोद बेरे, संतोष पाटील, डॉ. अशोक शेळके, विठ्ठल वरकडं, गणेश पवार, नवनाथ जानकर, दत्तात्रेय घोडके, रामभाऊ गायकवाड, विनोद शिंदे आदींसह अनेक मान्यवर व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.



