पाथुर्डीतून तीन शेळ्यांची चोरी

करमाळा(दि.२७)पाथुर्डी शिवारात अज्ञात चोरट्यांनी पत्रा शेड फोडून तीन शेळ्यांची चोरी केली आहे. ही घटना 21 ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतर घडली आहे. या प्रकरणी शितलकुमार श्रीरंग मोटे (वय 42, व्यवसाय- पत्रकार, रा. पाथर्डी) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, पाथुर्डी शिवारातील केम-रोपळे रस्त्यालगत आमची वस्ती आहे. आम्ही शेळ्या पालनासाठी पत्र्याचे शेड केले आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे शेळ्या शेडमध्ये बांधून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून शेडमधील एक गाभण मोठी काळ्या रंगाची शेळी (किंमत 10,000 रुपये) व दोन लहान काळ्या रंगाच्या एक वर्षाच्या शेळ्या (प्रत्येकी किंमत 7,500 रुपये) अशा एकूण 25,000 रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्या.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



