गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे मोफत रक्त-नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

करमाळा – वेताळ पेठ येथील गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी मंडळाच्यावतीने शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी संजीवनी हॉस्पिटल, वेताळपेठ, करमाळा येथे मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली.

मंडळाचे यंदाचे स्थापनेचे २६ वे वर्ष असून
या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी रक्तातील शुगर, HBA1C, किडनी तपासणी (KFT), लिव्हर तपासणी (LFT), कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल अशा महत्त्वाच्या चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
रक्त तपासणी शिबिर वेळ : सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
रक्तदान शिबिर वेळ : सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबने यंदा करमाळा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे करमाळा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत ढाळे यांनी केले आहे.



