मुख्य बाजारपेठेत तीन व चार चाकी वाहनांना बंदी – जगताप यांच्या मागणीला यश

करमाळा: शहरातील मुख्य बाजारपेठ अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे नेहमीच कोंडी होत असते. त्यामुळे व्यापारी वर्ग आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आगामी गणेशोत्सव व इतर सणासुदीच्या काळात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुख्य बाजारपेठेतून तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप यांनी करमाळा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती.


या मागणीची दखल घेत पोलिसांनी फुलसौंदर चौक, पंजाब वस्ताद चौक, छत्रपती चौक, राशिन पेठ, दत्तपेठ आदी मार्गांवर बॅरिगेट्स उभारून वाहनांचा प्रवेश बंद केला आहे. परिणामी बाजारपेठेत वाहनांची गर्दी कमी होऊन पादचारी व खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळे प्रसाद जगताप यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. श्री जगताप यांनी पोलीस निरीक्षक रणजीत माने व त्यांच्या टीमचे आभार मानले आहे. सध्या तरी ही बंदी फक्त गणेशोत्सव काळात पुरती मर्यादित असल्याचे समजते.
संबंधित बातमी : सणासुदीच्या काळात मेनरोडवर तीन व चारचाकींना बंदी घालण्याची मागणी




