गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऊत्तरेश्वर देवस्थानात आकर्षक सजावट

केम (संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील जागृत देवस्थान श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगाची सोमवार आणि गणेशोत्सव निमित्त विशेष सजावट करण्यात आली. या वेळी शिवलिंगास गणेशरूप देऊन पूजा करण्यात आली.
ही सजावट पुजारी भैय्या मोकाशी, कृष्णा गुरव आणि तात्या गुरव यांनी केली. संकल्पना भैय्या मोकाशी यांची होती. सजावट पाहण्यासाठी गावातील अनेक भाविकांनी मंदिरात भेट दिली.
या मंदिरात विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने शिवलिंगाची वेगवेगळ्या रूपातील सजावट करण्यात येते. त्याच परंपरेनुसार यंदा गणेशरूप सजावट साकारण्यात आली.