करमाळा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल वाशिंबेकर यांचे निधन -

करमाळा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल वाशिंबेकर यांचे निधन

0

करमाळा, ता.4 : येथील करमाळा अर्बन बँकेचे माजी चेअरमन व संचालक तसेच करमाळा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल (भाऊ) तुकाराम वाशिंबेकर ( वय -74) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे 5 वाजता पुणे येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,चार मुली व दोन भाऊ, भावजयी, पुतणे,पुतणी असा परिवार आहे.

श्री.वाशिंबेकर हे काही दिवसापासून पित्ताच्या त्रासाने त्रस्त होते ,त्यातून त्यांच्या छातीत कफ झाल्यानंतर पुणे येथे उपचारासाठी नेले आणि उपचार चालू असताना आज ( ता.४) पहाटे पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. श्री.वाशिंबेकर हे पंढरपूर येथील नरहरी महाराज संस्थेचे संचालक असून करमाळा शहर व तालुक्यातील राजकारणात व सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पत्नी सुनिताताई या करमाळा शहरातील जनमातातून निवडून आलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होत्या.

करमाळा अर्बन बँकेचे संचालक अभिजित वाशिंबेकर यांचे वडील तर राजेंद्र व सुनील यांचे ते बंधु होते. आज सायंकाळी चार वाजता करमाळा येथील अमरधाम या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!