प्रसिद्ध कीर्तनकार ढोक महाराजांचे केम येथे कीर्तन

केम(संजय जाधव) : केम येथील व्यापारी पेठेच्या टिळक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आज (शुक्रवारी,दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ढोक महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष धनंजय सोलापूरे यांनी दिली.

कीर्तनाचे आयोजन श्री ऊत्तरेश्वर मंदिरातील सभागृहात करण्यात आले असून, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

मंडळ सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून, गेल्या वर्षी पारंपरिक वाद्यांसह डीजेमुक्त मिरवणूक काढल्याबद्दल करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाला सन्मानित करण्यात आले होते. यावर्षीदेखील मंडळाने अथर्वशीर्ष पठण, कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम राबविले आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक देखील पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार आहे.




