करमाळा येथे संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन -

करमाळा येथे संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

0

करमाळा : करमाळा शहर व तालुक्यातील कैकाडी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन केशव विहीर परिसरात करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रणजित माने व भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सांस्कृतिक भवनामुळे कैकाडी समाजासह गोरगरीब घटकांना सामुदायिक कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध होणार आहे. या मागणीसाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

पोलीस निरीक्षक रणजित माने यावेळी म्हणाले की, “या भवनामुळे करमाळा शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक वैभवात भर पडेल.” तर गणेश चिवटे यांनी सांगितले की, “अफसर जाधव यांच्या प्रयत्नांमुळे हे समाजमंदिर उभारले जात असून गोरगरीबांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. या उभारणीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी या भव्य भवनामुळे समाजजीवनाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले.

“मी अनेक वर्षे गणेश चिवटे यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. त्यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. समाजाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.”
अफसर जाधव, डबल महाराष्ट्र चॅम्पियन

या वेळी भाजपा नेते रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, रामकृष्ण माने, संतोष जाधव, मारुती जाधव, रवी जाधव, धनंजय माने, सचिन माने, आकाश जाधव, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, सरपंच सुभाष हानपुडे, संजय दुरगुळे, सोमनाथ घाडगे, बंडू शिंदे, विष्णू रंदवे, पत्रकार दिनेश मडके, राजु सय्यद, राजश्री खाडे, संगीता नष्टे, चंपावती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!