पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक – गुन्हा दाखल

करमाळा ता.9: कुर्डू (ता. माढा) येथे बेकायदेशीर जमाव जमल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आय. पी. एस. अंजना कृष्णा कार्यवाहीसाठी रवाना झाले होत्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गावकऱ्यांनी फोन करून माहिती दिली व त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अंजना कृष्णा यांना सुनावले. त्यांचा व्हिडिओ काॅल करून जनमानसात पसरविला.

त्यानंतर या बाबीच्या निषेधार्थ देवीचामाळ येथील कमला भवनी मंदिरासमोर अंजना कृष्णा व्ही. एस. यांचे पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला.. यात अतुल खुपसे, गणेश भानवसे, बालाजी तरंगे, किशोर बापू शिंदे, काका दरगुडे, वैभव मस्के, निलेश पवार, साहेबराव वीटकर, हनुमंत कानतोडे, सागर व शरद यांचा सहभाग असल्याची माहिती आहे.

यासर्वांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमल्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) भंग केला आहे. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांनी या सर्वांच्या विरुद्ध फिर्याद दिली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


