वाढदिवसानिमित्त गुटाळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कंदर(संदीप कांबळे): आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक व पांगरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय गुटाळ यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.

शिवनेरी प्रतिष्ठान व संजय गुटाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पांगरे, वांगी गुटाळ वस्ती, कविटगाव व भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी भारत टेकाळे, प्रदीप टेकाळे, पप्पू गुटाळ, गहिनीनाथ गुंजाळ, सचिन टेकाळे, गणेश वाघमारे, सुधीर माने, राहुल गुटाळ, शिवाजी चौधरी, दादा गरड, नाना पांडव, स्वप्नील पारेकर, पंढरीनाथ गुरव, गणेश गुटाळ, सचिन पाडसे, सोमनाथ गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.



