विहाळच्या ३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड -

विहाळच्या ३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड

0

करमाळा : दिनांक ९ सप्टेंबर रोजी जेऊर येथे शालेय क्रीडा विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत माध्यमिक विद्यालय विहाळच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

इयत्ता दहावीतील विद्यार्थी ज्ञानवर्धन पंढरीनाथ गाडे, शिवाजी बापू येळे व विवेक नरूटे यांनी वेगवेगळ्या वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच विद्यालयातील अशोक शेळके याने द्वितीय क्रमांक मिळवला.

ज्ञानवर्धन गाडे, विवेक नरूटे व शिवाजी येळे या तिघांची जिल्हास्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मच्छिंद्र वाघमारे व कुस्ती मार्गदर्शक कृष्णा कदम यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक पंढरीनाथ गाडे यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!