शिक्षिका रत्नमाला होरणे-वेळापुरे यांचा अनोखा उपक्रम

करमाळा : कंदर येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका रत्नमाला होरणे-वेळापुरे यांची कंदर येथून भांगेवस्ती या शाळेवर बदली झाली. त्यांनी भांगेवस्ती येथील नव्या शाळेत प्रवेश करताना एक विलक्षण आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविला.
विद्यार्थिनींना खुर्चीवर बसवून, त्यांच्या पायावर पाणी घालून, पूजन करून,ओवाळून मगच स्वतः शाळेत प्रवेश केला.


हे दृश्य फक्त अनोखेच नव्हे तर समाजाला विचार करायला लावणारे आहे. आजवर आपण गुरुची पूजा करणारे विद्यार्थी पाहिले; पण येथे गुरु स्वतः विद्यार्थ्यांची पूजा करताना दिसतात.हीच खरी गुरुत्वाची जाणीव!
शिक्षण केवळ ज्ञान देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आदर, सन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करणे असते. तेच काम सौ. होरणे- वेळापुरे यांनी केले.




