नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश -

नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

0

केम(संजय जाधव): जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग, तायक्वांदो तसेच तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत (17 वर्षे वयोगट, 51 किलो वजन गट) उदयसिंह रामचंद्र फडतरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतही त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

करमाळा येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे यश मिळवले :

  • 19 वर्षे वयोगट 100 मीटर धावणे – विनायक श्याम कळसाईत (द्वितीय)
  • 19 वर्षे वयोगट 3000 मीटर धावणे – शिवाजी बिभीषण बातखबर (द्वितीय), गणेश वसंत सावंत (तृतीय)
  • 19 वर्षे वयोगट 200 मीटर धावणे – विनायक श्याम कळसाईत (द्वितीय)
  • 19 वर्षे वयोगट 100 मीटर धावणे – वृषाली महेश राजपुरे (तृतीय)
  • 14 वर्षे वयोगट गोळाफेक – यश बाळू अवघडे (द्वितीय)
  • 19 वर्षे वयोगट थाळीफेक – सोहम दशरथ पारखे (तृतीय)
  • 19 वर्षे वयोगट गोळाफेक – रवी बलभीम गाडे (तृतीय)
  • 19 वर्षे वयोगट हॅमर थ्रो – गणेश वसंत सावंत (प्रथम)
  • 19 वर्षे वयोगट भालाफेक – दिव्या अच्युत गुरव (तृतीय)
  • 19 वर्षे वयोगट कुस्ती स्पर्धेत श्रेयस दत्तात्रेय धिमधीमे – द्वितीय क्रमांक मिळवला.
  • बुद्धिबळ स्पर्धेत विश्वजीत धनंजय तापमागे व विनायक श्याम कळसाईत यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव भाऊसाहेब बिचितकर व चेअरमन सुदर्शन बापू तळेकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!