कमला भवानी देवी नवरात्र उत्सव नियोजनासाठी शांतता कमिटीची बैठक संपन्न -

कमला भवानी देवी नवरात्र उत्सव नियोजनासाठी शांतता कमिटीची बैठक संपन्न

0

करमाळा : श्री कमलादेवी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात गुरुवारी दि. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या मक्ता मिटिंग व शांतता कमिटी बैठकीत उत्सवाचे नियोजन ठरविण्यात आले.

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता बैठक पार पडली. यावेळी जयदीप पुजारी, रामदास सोरटे व भारत सोरटे यांना २२ सप्टेंबर २०२५ ते भाद्रपद वद्य अमावस्या पर्यंत एक वर्षाचा मक्ता देण्यात आला. घटस्थापनेची महापूजा तहसीलदार शिल्पा ठोकडे व त्यांचे पती सुधीर मल्लिकार्जुन घोंगडे यांच्या हस्ते होणार आहे. अष्टमीला होमपूजा होणार आहे.

उत्सव काळात भक्तांसाठी सीसीटीव्ही, उड्डाण पूल, स्टील रेलिंग रांग, गोपुरे, दिपमाळी, विद्युत रोषणाई व आकर्षक डेकोरेशन यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येतील. पारंपरिक बॅण्ड पथकही सज्ज होणार आहे.

शांतता कमिटी बैठकीला डिवायएसपी अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक रणजित माने उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, डॉ. रोहन पाटील, सुशील राठोड, ॲड. शिरीषकुमार लोणकर, राजेंद्र वाशिंबेकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, सदस्य, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!