केम येथे राज्यभरातील साधुसंतांच्या उपस्थितीत विद्यागिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

केम(संजय जाधव) – ब्रह्मचैतन्य विद्या गिरी महाराज यांची १९वी पुण्यतिथी १८ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध आखाड्यातील साधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निमित्त सकाळी आठ ते दहा या वेळेत सर्व समाध्यांना व देवस्थानांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. परमेश्वर महाराज दहिवली यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महंत जयंतगिरी महाराज, श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री ऊत्तरेश्वर भक्त मंडळी यांनी परिश्रम घेतले.



