सावडी येथील शाळेला विविध समाजहितैषी दात्यांच्या पुढाकारातून १६ लोखंडी बेंच भेट

करमाळा : सावडी(ता.करमाळा) येथील दिगंबर बागल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध समाजहितैषी दात्यांच्या पुढाकारातून १६ लोखंडी बेंच देण्यात आले.

यामध्ये उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी तीन बेंच दिले. त्याच बरोबर सावडी येथील माजी सैनिक श्याम वालेकर , संदीप वायाळ, (बीडीओ येवला), पोलिस निरीक्षक संतोष बोराडे (ठाणे, कोनगाव) , संकल्पना मांडरे, आजिनाथ खाटमोडे यांनी प्रत्येकी दोन बेंच दिले. डॉ. नवनाथ जाधव व गणेश एकाड यांनी प्रत्येकी एक बेंच दिले. याशिवाय वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सर्वेश दत्तात्रय जाधव याच्याकडून एक बेंच विद्यालयाकरिता दिला. अशी एकूण १६ बेंच विद्यालयास भेट म्हणून दिल्या.






