शेळके वस्ती दहिगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाडूळे तर उपाध्यक्षपदी वाघमोडे यांची निवड

करमाळा(दि.12): शेळके वस्ती दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीची निवड आज पार पडली. या निवडीत ज्योतीराम भिमराव पाडूळे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी, तर लक्ष्मण भैरवनाथ वाघमोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालकांमधूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या वेळी दहिगाव गावचे सरपंच संजय गलांडे, सोसायटी चेअरमन हरिश्चंद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शेंडगे, दिलीप शेळके, योगेश वाघमोडे, महादेव कोंडलकर, नारायण मोटे, समाधान जाधव, बालाजी गलांडे, विनायक पाडूळे, महाराज अतुल कवचाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीचे कामकाज दस्तगीर शेख व विजय राऊत यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार शिक्षक स्टाफच्या वतीने करण्यात आला.




