सेवानिवृत्त पोस्टमन विठ्ठल पोतदार यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१२: कोर्टी (ता. करमाळा) येथील रहिवासी व सेवानिवृत्त पोस्टमन विठ्ठल नरहरी पोतदार यांचे निधन दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी करमाळा येथे अल्पशा आजाराने झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, तसेच एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.पंचायत समिती कार्यालयातील मा. कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब पोतदार यांचे ते बंधु होते.
ग्रामीण भागात पोस्टमन म्हणून कार्यरत असताना त्यांनी कर्तव्यनिष्ठा, मनमिळावूपणा आणि प्रामाणिक सेवेमुळे लोकमानसात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
