संगोबा येथे रामकृष्ण हरी जप व्दिवर्षपुर्ती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

करमाळा, ता.१८: संगोबा येथील तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिरात सुरू असलेल्या रामकृष्ण हरी बीजमंत्र जपाला दोन वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानदिनी तसेच सोमवती अमावास्यानिमित्ताने सोमवार दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी वासकर वारकरी संप्रदायाचे श्रीगुरु ह.भ.प. देवव्रत तथा राणोजी वासकर महाराज स्वतः उपस्थित राहणार असून त्यांची प्रवचन सेवा होणार आहे.
- कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
- सायं. 4.00 ते 5.30: सामूहिक रामकृष्ण हरी जप,
- सायं. 6.00 ते 7.00: प्रवचन सेवा – ह.भ.प. देवव्रत (राणोजी) वासकर महाराज,
- रात्री 7.00 ते 9.00: किर्तन सेवा – वासकर फडातील ह.भ.प. आनंद महाराज जाधव, भालेवाडी यांची होणार आहे.
- किर्तनानंतर सर्व उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धर्मप्रसंगी वारकरी संप्रदायातील सर्व भाविक, श्री अदिनाथ महाराजांचे भक्त तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज अन्नछत्र मंडळ, संगोबा-पंचक्रोशीचे मुख्य प्रवर्तक ॲड. प्रा. शशिकांत नरुटे तसेच नियोजक आणि पाईक वारकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष वासकर फडातील ह.भ.प. संजय (बप्पा) गायकवाड यांनी केले आहे.




