युवा शेतकरी संदीप पराडे यांना राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित

कंदर(संदीप कांबळे)शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान याचा वापर करून शेतीमध्ये जास्त उत्पादन घेऊन तरुण शेतकरी यांना आदर्श देण्याचे काम करणारे कंदर तालुका करमाळा येथील प्रगतशील युवा शेतकरी संदीप पराडे यांच्या शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार बारामती जि.पुणे येथे कृत्रिम पावसावर संशोधन करणाऱ्या प्रमुख शास्त्रज्ञ सौ नीता दोशी तसेच सुप्रसिद्ध सिने अभिनेते गजानन गडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शेती क्षेत्रात सतत नवीन प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल असतो.तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने उत्पादन घेऊन शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे असा सल्ला श्री. पराडे यांनी दिला.




