भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त केम येथे संगीतमय शिवपुराण कथा

केम (संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक कुंडलिक तळेकर यांनी दिली.

या कार्यक्रमांची सुरुवात ६ नोव्हेंबर रोजी होऊन १२ नोव्हेंबरपर्यंत आठवडाभर विविध उपक्रम पार पडणार आहेत. या कालावधीत दररोज सकाळी आठ ते नऊ अभिषेक, सायंकाळी सहा ते सात ग्रंथपूजन आणि सात ते दहा या वेळेत संगीतमय शिवपुराण कथा कथाकार अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांच्या उपस्थितीत होईल.

१२ नोव्हेंबर रोजी भैरवनाथ जन्मोत्सव दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी दहा ते एक आणि रात्री नऊ ते बारा या वेळेत भैरवनाथ जन्माचे कीर्तन ह.भ.प. हरिभाऊ नामदास महाराज (पंढरपूर) यांच्या कीर्तनाने होईल. मध्यरात्री बारा वाजता भैरवनाथ जन्म सोहळ्यानंतर मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात येईल.
तसेच १३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन ह.भ.प. लालासाहेब चोपडे (इंदापूर) यांच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
भक्तांनी या धार्मिक सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भैरवनाथ कमिटी, केम यांच्या वतीने करण्यात आले आहे.





