करमाळा नगरपरिषदेची निवडणूक समविचारी गटाशी युती करून लढवणार – शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचा निर्धार -

करमाळा नगरपरिषदेची निवडणूक समविचारी गटाशी युती करून लढवणार – शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचा निर्धार

0

करमाळा (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत करमाळा नगरपरिषदेची होऊ घातलेली निवडणूक शहरातील समविचारी गटाशी युती करून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपापली मते मांडली. या सर्वांशी तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, उपजिल्हाप्रमुख संजय शिंदे आणि शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांनी सविस्तर चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. कोणत्या गटासोबत युती करून निवडणूक लढवायची, याबाबतचे सर्व अधिकार शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. कटारिया म्हणाले की, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, उपजिल्हाप्रमुख संजय शिंदे, ज्येष्ठ नेते गजानन ननवरे तसेच शहरातील सर्व पदाधिकारी, युवासेना व महिला आघाडी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आणि विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

या बैठकीस गजानन ननवरे, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, संजय भालेराव, युवासेना तालुका अधिकारी समाधान फरतडे, शहर युवा अधिकारी कल्पेश राक्षे, समीर परदेशी, प्रसाद निंबाळकर, दीपक भोसले, आकीब सय्यद, अनिकेत केंगार, सुधीर कटारिया, सुजित रासकर, सुनील वायकर, राजेंद्र पिसे, संतोष ननवरे, सचिन मुसळे, सुरज गोरे, तसेच मोहम्मद हाफिज कुरेशी, युनूस मनेरी, राजेंद्र दीक्षित, अनिल माने व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!