जिव्हाळा ग्रुपचे विचारवेध संमेलन संपन्न -

जिव्हाळा ग्रुपचे विचारवेध संमेलन संपन्न

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.४:  जिव्हाळा ग्रुप  यांच्या वतीने बिटरगाव (वांगी) येथील  उजनी धरणाच्या काठावरील पाटील वस्ती येथे विचार वेध  संमेलन   मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध विषयावर चर्चासत्र तसेच गीत,कविता गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला . स्व. विनायकराव पाटील यांच्या  पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी जिव्हाळा ग्रुप चे प्रमुख डाॅ. ॲड बाबुराव हिरडे, आनंद चे संस्थापक  डॉ. सुभाष सुराणा,सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, संतसाहित्याचे अभ्यासक डाॅ.प्रा .संजय चौधरी, लोकविकास चे दिपक आबा देशमुख, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड,  माजी प्राचार्य एन.एम. माने, शाटर्डे ग्रुप चे भुषण लुंकड, ग्रामसुधार चे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे,
डाॅ. सोमनाथ खराडे,जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी  राजेंद्र रणसिंग,  माजी मुख्याध्यापक एन. डी. सुरवसे, लक्ष्मण लष्कर,आनंद चे सचिव भारत रोकडे,सेंद्रिय शेती तज्ञ हनुमंत यादव, संयोजक महेंद्र पाटील, संदेश पाटील, श्रुती पाटील आदीजण  उपस्थित होते.

यावेळी डाॅ. सुराणा यांनी रक्तदाब, मधुमेह यासारख्या वाढत्या आजारमुळे  प्रत्येकांनी आपली  जीवनशैली बदलण्याची गरज आहे.
आपले आरोग्य हे खुप महत्वाचे असून त्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायामात भरभर व सावकाश चालणे हा व्यायाम महत्त्वाचा आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या खुप आहेत. केळी चे भाव गेल्यावर्षी चिलींग च्या नावाखाली पाडले, यावर्षी निर्यातीच्या नावाखाली दर पाडले. याला पर्याय म्हणून केळीचे चिफ्स,केळीची पावडर,पानाच्या पंतरवाळ्या, तर बुंध्यापासून धागे काढून कापड बनवले पाहिजे व ते काम जिव्हाळा ग्रुपने केले पाहिजे. शेतकरी व युवकांच्या समस्या सोडवण्याचे काम , शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. तसेच एकत्र कुटुंब पद्धती टिकवण्याची गरज आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे फार मोठे फायदे असून  प्रत्येकाला एकमेकांच्या मनभावनेचा विचार करावा लागतो,यामध्ये कुटुंबातील महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत असते .
डाॅ. ॲड. बाबूराव हिरडे

  प्रा. संजय चौधरी यांनी सुखी जीवनासाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली समाजातला एकत्र येण्यापासून रोखणाऱ्या काही शक्ती कार्यरत असून त्या ओळखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात सुरुवातीला माजी मुख्याध्यापक लक्ष्मण लष्कर  यांनी  स्वागतगीताने प्रारंभ केला.यावेळी कवी प्रकाश लावंड यांनी आपल्या कविता व गजेंद्र पोळ यांनी अंतर्मुख करायला लावणाऱ्या चारोळ्या, वात्रटिका सादर केल्या, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल माने यांनी अंधश्रद्धाचे प्रयोग सादर केले, प्राचार्य एन.एम. माने यांनी मनोगत व्यक्त करत सुंदर बासरीवादक केले, प्रा. एन डी सुरवसे ,राजेंद्र रणसिंग, श्रेणिक खाटेर, भारत रोकडे, डॉ सोमनाथ खराडे,देशमुख मामा यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला आदिनाथ संचालक ॲड राहूल सावंत, डाॅ. हरिदास केवारे लोकविकास डेअरीचे चेअरमन दीपक देशमुख माजी संचालक भारत साळुंके, भूषण लुंकड, विलास लबडे ,नानासाहेब साळुंके ,गंगाधर पोळ, दिगंबर साळुंके,धनंजय देशमुख मा. गटशिक्षण अधिकारी माळशिरस ,हेमलता पाटील सरपंच बिटरगाव (वां) आदिनाथचे संचालक दत्ता देशमुख,
बाबासाहेब आरकीले, जोतीराम सरडे,विठ्ठल शेळके, मा. सरपंच वांगी
शंकर सरडे,  आबासाहेब नलवडे, उपसरपंच ,अमरसिंह आरकीले भिवरवाडी , बाळासाहेब गुंड-पाटील (पटवर्धन कुरोली), वैभव पाटील, गणेश पाटील मा. उपसरपंच वांगी, संजय देशमुख यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन तकिक यांनी केले तर आभार महेंद्र पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!