कंदर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड

कंदर(संदीप कांबळे): करमाळा तालुक्यातील कंदर गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब प्रभाकर लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आठ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने नानासाहेब लोकरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडीच्या वेळी लोकनियुक्त सरपंच मौला मुलाणी, उपसरपंच उदयसिंह शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना नानासाहेब लोकरे म्हणाले, “कंदरसारख्या मोठ्या गावात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. गावातील तंटे गावातच मिटवण्यावर भर देणार असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.” निवडीनंतर लोकरे यांचा सत्कार करण्यात आला.



