निमगाव (ह) येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात इंदोरीकर महाराज व नामवंत कलाकारांचा सहभाग

करमाळा(दि.१३): निमगाव (ह) (ता. करमाळा) येथील ह.भ.प. बाळासाहेब नीळ पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे नीळ पाटील परिवाराकडून १४ नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानिमित्त दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता मौजे निमगाव हवेली येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच सायं. ८ ते ११ वाजेपर्यंत सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री बाळासाहेब वाईकर गुरुजी, संगीत अलंकार शिवानंद स्वामी (पुणे), ह.भ.प. सतीश महाराज सूर्यवंशी आणि तबला साथीसाठी तालसम्राट शेखर दरवडे (अहिल्यानगर) यांच्या उपस्थितीत सुगम संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या आनंदमयी सोहळ्याला निमगाव हवेली व पंचक्रोशीतील नागरिक, तसेच कीर्तन व भजन प्रेमी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अविनाश बाळासाहेब पाटील व डॉ. पद्मिनी अविनाश पाटील यांनी केले आहे.



