जगताप यांच्या नियुक्तीची नाराजी : बागल समर्थकांचे सामूहिक राजीनामा नाट्य

करमाळा(दि. १४):करमाळा आणि कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) माजी आमदार जयवंतराव जगताप यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी तयार झालेली आहे. दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनाम्यांची घोषणा केली आहे.

५५ शाखाध्यक्षांचा राजीनामा
जगताप यांची नियुक्ती होताच बागल गटातील नाराजी उफाळून आली. या गटातील ५५ शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले. त्यामुळे करमाळा शहरातील शिंदे गटाची संघटनात्मक ताकद कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यासोबतच बागल समर्थकांनी नोंदणीकृत २० हजार सभासदही पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती दिली. हे सभासद आपापले राजीनामे पोस्टाने पक्ष नेतृत्वापर्यंत पाठवणार आहेत.

बागल गटात नाराजी का?
दिग्विजय बागल यांनी नुकतीच 2024 ची करमाळा विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून लढवली होती. त्यामुळे करमाळा तालुक्यात त्यांचा मोठा समर्थक वर्ग शिवेसनेत सामील झाला होता. आगामी निवडणुकीत बागल यांना दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना या गटात निर्माण झाली असून, त्यातूनच हे राजीनामा नाट्य घडल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.

बैठकीसाठी मोठी उपस्थिती
या निर्णयासाठी झालेल्या बैठकीस या बैठकीस श्री मकाई सह साखर कारखाना संचालक सतीश नीळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, माजी सरपंच नवनाथ बदर, अशोक हनपूडे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, राणा वाघमारे, विजयसिंह हाके, रवी भाऊ शेळके ,अक्षय सरडे, केशव शिवाजी बोराडे, विशाल साधू शिंदे, आनंद रामभाऊ टेकाळे, विजय संजय काळे, प्रशांत भगवान पवार, केशव शिवाजी बोराडे, संदीप पोपट गोडसे, महादेव विठ्ठल माने, सतीश विठ्ठल सोनवणे, दत्तात्रेय रविंद्र काळे,


लहू नवनाथ पवार, सचिन नाना शिंदे, पप्पू मारुती सरक, शहाजी गजब काळे, दीपक पांडुरंग हाके, संदीप प्रकाश हाके, सतीश शिवाजी घेडे, हेमंत दत्तात्रेय शिंगरे, सुदाम दादासाहेब झोळ, हेमंत दत्तात्रय गिरंजे, संजय गणपत डोळे, संतोष सोपान चांदणे, ओमकार बाळासाहेब करे, प्रमोद अंबादास हाके, प्रतीक दत्तात्रे हाके, विशाल विष्णू माने, किरण विठ्ठल डोंगरे, संदेश मोहन भोगे, जावेद पठाण, मुबारक इनामदारविविध गावातील ५५ शिवसेना शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
