नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जयश्री घुमरे यांचा अर्ज दाखल

करमाळा – करमाळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज जयश्री विलासराव घुमरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दाखल केला.

करमाळा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्याचे ध्येय ठेवून उमेदवारी अर्ज सादर केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध पक्ष–पदाधिकारी व स्थानिक नेतृत्व उपस्थित होते.

अर्ज दाखल करताना उपस्थितांमध्ये माजी आमदार शमला बागल, भाजप प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल–कोलते, पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलासराव घुमरे, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगरपरिषदेसाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. अर्ज दाखलप्रसंगी माजी नगरसेवक अतुल फंड, युवा नेते विजय लावंड, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, राम ढाणे, माजी नगरसेवक सचिन घोलप, मकाईचे संचालक अमोल यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

