नगराध्यक्षपदासाठी आठ महिलांचे अर्ज-भाजप-शिवसेना समोरासमोर, शहर विकास आघाडीचा तिसरा पर्याय - आज छाननी -

नगराध्यक्षपदासाठी आठ महिलांचे अर्ज-भाजप-शिवसेना समोरासमोर, शहर विकास आघाडीचा तिसरा पर्याय – आज छाननी

0

करमाळा,ता.१८:करमाळा नगरपालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (१७ नोव्हेंबर) काल दिवसभर निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होती. रात्री उशिरा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून एकूण आठ महिला उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.नगराध्यक्ष पद महिलांसाठी सर्वसाधारण राखीव असल्याने करमाळा नगरपरिषद निवडणुकीत यंदा अभूतपूर्व स्पर्धेचे चित्र निर्माण झाले आहे.

आज (१८ नोव्हेंबर) अर्जांची छाननी होणार असून कोणाचे अर्ज वैध ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन आघाड्यांमध्ये चुरस — भाजप विरुद्ध शिवसेना, तिसरी आघाडी सावंत गटाची

करमाळा नगराध्यक्ष पदासाठी यावेळी निवडणूक ही पूर्णपणे ‘पक्षीय’ रंगात रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी गटात शिवसेना विरुद्ध भाजपा असा सरळ सामना होणार असून सावंत गटाच्या शहर विकास आघाडीने तिसरी पर्याय निर्माण करून उमेदवार उभा करून लढतीत वेगळे समीकरण निर्माण केले आहे.

भाजपाकडून दोन अर्ज

  • जयश्री विलास घुमरे
  • सुनंदा कन्हैयालाल देवी

यांचे अर्ज असलातरी सौ. देवी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून दोन अर्ज

  • महानंदा जयवंतराव जगताप
  • संगीता श्रेणिक खाटेर

यांचे अर्ज असलेतरी सौ. जगताप यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

इतर पक्ष व अपक्ष

  • राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) : भावना भद्रेश गांधी
  • शहर विकास आघाडी : मोहिनी संजय सावंत
  • अपक्ष : चैताली सुनील सावंत
  • अपक्ष : प्रियंका सिद्धांत वाघमारे.

अशा प्रकारे एकूण आठ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत.

२५ नोव्हेंबरला स्पष्ट चित्र होणार

छाननीनंतर कोण उमेदवार शर्यतीत राहणार आणि कोण माघार घेणार की नाही  याबाबतच्या राजकीय चर्चांनी वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस २५ नोव्हेंबर असल्याने अंतिम तिढा याच दिवशी स्पष्ट होणार आहे.करमाळा नगराध्यक्ष पदाची ही  बहु-उमेदवारांची लढत यंदा विशेष लक्षवेधी ठरणार हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!