करमाळा नगरपरिषद निवडणूक : 20 जागांसाठी 150 उमेदवारांची जोरदार रस्सीखेच-छाननीत सर्व अर्ज मंजूर…

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१८ : करमाळा नगरपरिषद निवडणुकीत यंदा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आलेले अर्ज पहाता 20 जागेसाठी एकूण 150 उमेदवारांचे 254 अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी 8 महिला उमेदवारांचे 15 अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व पहाता स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून दोन जागेसाठी म्हणजे १० प्रभागांमधून अ व ब अशा २० जागांसाठी मतदान होणार असून, अर्ज दाखल केलेल्यांमध्ये १८ माजी नगरसेवक व ३ माजी नगराध्यक्षांसह अनेक सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक, बँक कर्मचारी, पक्ष पदाधिकारी, ॲडव्होकेट, सामाजिक कार्यकर्ते असे विविध क्षेत्रातील चेहरे रिंगणात उतरले आहेत.
कोणत्या प्रभागात किती अर्ज?
सर्वाधिक अर्ज प्रभाग 1ब, 3ब, 7ब आणि 8ब मध्ये प्रत्येकी 10 उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत.तर सर्वात कमी उमेदवारी अर्ज प्रभाग 2अ व 2ब मध्ये, फक्त 4-4 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. इतर प्रभागांमध्येही 6 ते 9 या दरम्यान अर्ज दाखल झाले आहेत. माजी नगराध्यक्षांचा दमदार प्रवेश
रिंगणात उतरलेल्या जेष्ठ नेत्यांमध्ये शौकत नालबंद,प्रशांत ढाळे, वैभवराजे जगताप या तिघा माजी नगराध्यक्षांचा समावेश आहे. तर माजी नगरसेवकांमध्ये अतुल फंड, रवींद्र कांबळे, स्वाती फंड, सीमा कुंभार, साधना मंडलिक, अल्ताफ तांबोळी, राहुल जगताप,किरण बोकन, संजय सावंत, संगिता खाटेर, सविता कांबळे,राजश्री माने,प्रवीण जाधव ,प्राचार्य जयप्रकाश बीले यांसारखी अनुभवी नावे आहेत. प्रभागातून नातेवाईकांची लढतही रंगणार! या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये थेट नातेसंबंधातील टक्कर पाहायला मिळणार आहे.

प्रभाग 9 अ : चुलत जावयांची लढत
प्रभाग 5 ब : माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप विरुद्ध माजी नगरसेवक राहुल ‘भैय्या’ जगताप — चुलते–पुतण्यामधील ऐतिहासिक सामना पहावयास मिळणार आहे.
पक्षनिहाय स्पर्धा : सर्वच पक्षांचे जोरदार ताकदीचे उमेदवार
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, तसेच अनेक अपक्ष उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. अनेक प्रभागांत तिहेरी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
काही प्रभागांत भाजप–
शिवसेना–शहर विकास आघाडी व अपक्ष असे चौरंगी समीकरण तयार झाले आहे. या निवडणुकीत खालील क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. सेवानिवृत्त गाव कामगार तलाठी मुकुंदराज राज्योपाध्ये, भारतीय जनता पक्षाचे विद्यापीठ सिनेट प्रतिनिधी दीपक चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षिका सीमा कुंभार , सेवानिवृत्त शिक्षक महादेव यादव शिक्षक म्हणून कार्यरत असणारे राजू वाघमारे आशुतोष शेलार तसेच बँक सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर शीलवंत ,नगरपालिकेतून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी स्वाती माने, शहर शिवसेनेचे अध्यक्ष प्रवीण कटारिया भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत राखुंडे यांचा समावेश आहे.

प्रभाग निहाय उमेदवार व पक्ष
प्रभाग 1 अ …जबिन खलील मुलानी- शहर विकास आघाडी, रुबीना मगबुल पठाण- भारतीय जनता पार्टी ,बानू फारूक जमादार नॅशनल काँग्रेस पार्टी ,जेरीमुन्नीसा तयूब सय्यद- शिवसेना मंगल नारायण जाधव -अपक्ष, सपना संजय घोरपडे- भारतीय जनता पार्टी, सय्यद नाजमीन जाकिर -शिवसेना व पुष्पा बाळासाहेब कांबळे -भारतीय जनता पार्टी.
प्रभाग 1 ब मध्ये रवी नारायण जाधव -शहर विकास आघाडी, शौकत हुसेन नालबंद -भारतीय जनता पार्टी, जमादार फारूक म कासम -अपक्ष, अशितोष भानुदास शेलार- शिवसेना ,अश्फाक फारूक जमादार- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी व अमन शौकत नालबंद-अपक्ष प्रीतम अरुण बडेकर शिवसेना, जमीर खलील मुलानी अपक्ष, समर अब्दुल गणी शेख अपक्ष, महादेव आनंदराव यादव अपक्ष,
प्रभाग 2 अ ओबीसी साठी राखीव असून त्यामध्ये चौघ जणांचे अर्ज आलेले आहेत .शिवसेनेकडून राजू मुर्गू वाघमारे ,शहर विकास आघाडीकडून संजय भगवान सावंत, भारतीय जनता पार्टी कडून गोपाळ पांडुरंग वाघमारे अपक्ष मार्तंड मुकुंदराव सुरवसे
प्रभाग 2 ब सर्वसाधारण महिलेसाठी असून यामध्ये शिवसेनेकडून पल्लवी अभिजीत अंधारे ,शहर विकास आघाडीकडून ज्योत्सना सुनील कुमार लुनिया, शिवसेनेकडून सीमा गणेश कुकडे तर भारतीय जनता पार्टी कडून माया नंदकुमार कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे.
प्रभाग 3 अ इतर मागासवर्गीयासाठी राखीव असून त्यामध्ये
किरण अरुण बोकन भारतीय जनता पार्टी ,गोपाळ पांडुरंग वाघमारे भारतीय जनता पार्टी, अभय सुरेश महाजन शहर विकास आघाडी, स्वाती रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी ,संग्राम रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी ,निर्मला बाबुराव गायकवाड भारतीय जनता पार्टी, अल्ताफ हाजी असमुद्दीन तांबोळी शिवसेना ,अमीर अल्ताफ तांबोळी शिवसेना दिनेश हनुमंत जाधव अपक्ष, तारामती रामचंद्र क्षीरसागर भारतीय जनता पार्टी,
प्रभाग क्र.3 ब सर्वसाधारण महिलेसाठी असून यामध्ये एकूण आठ अर्ज आलेले आहेत. पूजा तुकाराम इंदलकर शहर विकास आघाडी संगीता श्रेणीक खाटेर शिवसेना, स्वाती रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी ,नंदा बब्रुवान इंदलकर अपक्ष, शशिकला राजेंद्र मांगले भारतीय जनता पार्टी, मोक्षा संकेत खाटेर शिवसेना, अश्विनी नितीन चांदगुडे भारतीय जनता पार्टी व तारामती रामचंद्र क्षीरसागर भारतीय जनता पार्टी
4 अ महिलासाठी राखीव
सहा अर्ज आले आहेत .त्यामध्ये सुनिता राजकुमार माळवदकर भारतीय जनता पार्टी, मीरा राजेंद्र शेंडगे शहर विकास आघाडी स्वाती महादेव फंड भारतीय जनता पार्टी, मनीषा हर्षवर्धन माळवकर भारतीय जनता पार्टी ,करिष्मा प्रज्योत कुंभार भारतीय जनता पार्टी, माधवी प्रमोद पोळ शिवसेना,
4 ब सर्वसाधारण साठी असून यामध्ये सहा उमेदवारी अर्ज आले आहेत. चंद्रकांत बबन राखुंडे शिवसेना, ओंकार गणेश चांदगुडे शहर विकास आघाडी अतुल हरिभाऊ फंड भारतीय जनता पार्टी अमोल हरिभाऊ फंड अपक्ष, अभंग तुकाराम कुंभार अपक्ष, महादेव फंड भारतीय जनता पार्टी
5 अ महिलांसाठी राखीव आहे त्यामध्ये एकूण सात अर्ज आलेले आहेत शहर विकास आघाडी तेजल नानासाहेब मोरे, नॅशनल काँग्रेस पार्टी सायरा अहमद कुरेशी शिवसेना, जमीन बानू अजीम कुरेशी भारतीय जनता पार्टी, नौशाद हुसेन बागवान शिवसेना, शहानुर अहमद कुरेशी शिवसेना ,संगीता देविदास नस्टे भारतीय जनता पार्टी 5 ब सर्वसाधारण साठी एकूण पाच अर्ज आले आहेत त्यामध्ये वैभवराजे जयवंतराव जगताप शिवसेना विक्रमसिंग विजयसिंह परदेशी शहर विकास आघाडी ,राहुल नामदेवराव जगताप भारतीय जनता पार्टी, रोहित सुभाष बलदोटा शिवसेना विश्वजीत देवीसिंग परदेशी अपक्ष
6 अ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे इथे एकूण सात अर्ज दाखल झालेले आहेत. शहर विकास आघाडीच्या साधना दासा मंडलिक ललिता करण आलात शिवसेना ,सुवर्णा रोहिदास आलात शिवसेना, श्रुती आदेश कांबळे भारतीय जनता पार्टी, सविता जयकुमार कांबळे भारतीय जनता पार्टी, साखरबाई बाळनाथ पवार अपक्ष, ऋतुजा महेश अलाट भारतीय जनता पार्टी
६ ब सर्वसाधारण जागा..प्रशांत ढाळे- शिवसेना, ओंकार ढाळे- शिवसेना, जगदीश अग्रवाल- भाजपा, रितेश कटारिया, प्रविण कटारिया – शहर विकास आघाडी, करण कृष्णा अलाट- भाजपा, चंद्रशेखर गौरीशंकर शीलवंत- भाजपा
7 अ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून त्यामध्ये नऊ अर्ज आलेले आहेत .यामध्ये इंदु गेंदाप्पा कांबळे शिवसेना, ज्योती रितेश कांबळे अपक्ष, वनिता लक्ष्मण कांबळे शहर विकास आघाडी,सुषमा श्रीकांत कांबळे भारतीय जनता पार्टी ,सविता जयकुमार कांबळे भारतीय जनता पार्टी, जनाबाई रवींद्र कांबळे शहर विकास आघाडी, अश्विनी सचिन अब्दुले शिवसेना, अमोल जाधव शिवसेना ,मनीषा सिद्धार्थ कांबळे नॅशनल काँग्रेस पार्टी यांचा समावेश आहे. 7 ब सर्वसाधारण जागा असून या ठिकाणी दहा उमेदवारी अर्ज आलेले आहेत. यामध्ये गणेश बाबासाहेब माने भारतीय जनता पार्टी, कुमार दत्तात्रय माने भारतीय जनता पार्टी, ऋषिकेश सतीश सिंगजी नॅशनल काँग्रेस पार्टी, पुष्पा प्रदीप शिंदे शहर विकास आघाडी ,जयदीप प्रकाश शिंदे अपक्ष, सिद्धांत सदाशिव वाघमारे अपक्ष, अजय नवनाथ कांबळे अपक्ष ,युवराज विलास चिवटे शिवसेना, नितीन दत्तात्रय चोपडे भारतीय जनता पार्टी व बसवराज सोमनाथ चिवटे शिवसेना असे अर्ज आलेले आहेत.
8 अ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून यामध्ये
सरोजिनी बबन पाटील अपक्ष ,भक्ति विशाल गायकवाड अपक्ष , प्रियंका सागर गायकवाड शहर विकास आघाडी, सुवर्णा प्रवीण जाधव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी , स्वाती अभिमन्यू माने भारतीय जनता पार्टी , मोनिका राम ढाणे भारतीय जनता पार्टी ,सुजाता ज्योतीराम ढाणे शिवसेना ,मीनल महेश पाटोळे शिवसेना आणि सुनीता बाळू ढाणे भारतीय जनता पार्टी तसेच 8 ब येथे सर्वसाधारण जागा असून यामध्ये मुकुंद रामचंद्र राजोपाध्ये अपक्ष ,सिकंदर मच्छिंद्र जाधव भारतीय जनता पार्टी , महेश दत्तात्रय पाटोळे शिवसेना ,संतोष रघुनाथ सापते शहर विकास आघाडी, ज्योतीराम महादेव ढाणे शिवसेना, प्रवीण प्रदीप जाधव नॅशनल काँग्रेस पार्टी ,दीपक अरुण चव्हाण भारतीय जनता पार्टी, प्रशांत प्रदीप जाधव नॅशनल काँग्रेस पार्टी, दादासाहेब महादेव ढाणे शिवसेना व राहुल बाळासाहेब घुमरे अपक्ष असे उमेदवारी अर्ज आले आहेत.
9 अ ओबीसी महिलांसाठी असून यामध्ये यामध्ये अश्विनी दिनेश घोलप शिवसेना, ज्योती सचिन घोलप भारतीय जनता पार्टी, लता विजयकुमार घोलप भारतीय जनता पार्टी ,सीमा रामदास कुंभार शिवसेना, सुरेखा राजकुमार जगताप शहर विकास आघाडी ,राजश्री दत्तात्रय माने भारतीय जनता पार्टी, स्वाती रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी, धनश्री जयंत दळवी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
9 ब सर्वसाधारण असून येथे विजयकुमार बाळासाहेब घोलप भारतीय जनता पार्टी ,सचिन रामचंद्र घोलप भारतीय जनता पार्टी ,युवराज जयप्रकाश बिले शिवसेना ,जयप्रकाश कोंडीबा बिले शिवसेना ,रोहित सुभाष बोलदोटा शिवसेना, गोपीनाथ कोंडींबा वीटकर शहर विकास आघाडी
10 अ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये एकूण नऊ अर्ज आलेले आहेत गौरव श्रीनिवास कांबळे शिवसेना ,करण कृष्णा आलाट अपक्ष ,निलेश श्रीनिवास कांबळे शिवसेना ,सुहास त्रिमूर्ती ओहोळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी रणजीत आजिनाथ कांबळे भारतीय जनता पार्टी ,सविता जयकुमार कांबळे भारतीय जनता पार्टी, सुनील भीमराव धाकतोडे शिवसेना, संदीप नामदेव कांबळे शहर विकास आघाडी व रवींद्र निवृत्ती कांबळे अपक्ष यांचा समावेश आहे
दहा ब हा सर्वसाधारण महिलेसाठी असून त्यामध्ये विजया किसान जानराव भारतीय जनता पार्टी ,विद्या सुरज मांगले शिवसेना, शबाना अल्ताफ तांबोळी शिवसेना, जबीनबानो अजीम कुरेशी भारतीय जनता पार्टी ,राजश्री दत्तात्रय माने भारतीय जनता पार्टी, इर्षाबी अजित तांबोळी अपक्ष, चैताली सुनील सावंत शहर विकास आघाडी अशा प्रकारे एकूण 150 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या सर्व अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांचे समोर १८ नोव्हेंबर ला झाली यात कोणीही कोणत्या उमेदवारावर हरकत घेतली नाही. त्यामुळे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत.यावेळी शिवसेने तर्फे ॲड.नवनाथ राखुंडे, भाजपा तर्फे ॲड. शिरीष लोणकर, ॲड.दत्तात्रय सोनवणे,शहर विकास आघाडीकडून ॲड. जयदीप देवकर, ॲड.राहुल सावंत हे उपस्थित होते.
या निवडणुकीमध्ये तीन माजी नगराध्यक्ष, 18 माजी नगरसेवक आणि नव्या चेहऱ्यांनी दिलेली दमदार एन्ट्री यामुळे ही निवडणूक करमाळ्यातील अलीकडील काळातील सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ठरणार आहे. नातेसंबंधातील सामने, प्रभागनिहाय चौफेर लढत आणि पक्षीय रणनीतीमुळे येत्या काही दिवसांत करमाळ्याचे राजकीय तापमान अधिकच चढणार आहे.

