कोर्टी येथे ३० नोव्हेंबरला मोफत मुळव्याध उपचार शिबिर

करमाळा: कोर्टी (ता. करमाळा) येथे परिवर्तन प्रतिष्ठान आणि राजेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुळव्याध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेझर उपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष शिबिर रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.

सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुळव्याध, फिशर, पाइल्स यांसारख्या आजारांबाबत अनेक नागरिक लाज किंवा गैरसमजामुळे तपासणी टाळतात. परिणामी आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रारंभीच्या टप्प्यात तपासणी व उपचार मिळावेत, यासाठी या शिबिराचे महत्त्व अधोरेखित होते.
मुळव्याध, फिशर, पाइल्सची प्रमुख लक्षणे :
शौचास आग किंवा जळजळ होणे
गुदमार्गाजवळ चिर पडणे (फिशर)
कोंब येणे किंवा रक्तस्राव होणे
सतत खाज व अस्वस्थता जाणवणे


शिबिराचे प्रमुख संयोजक डॉ. अमोल दुरंदे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार सहज व मोफत उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. रुग्णांनी कोणतीही लाज बाळगू नये. प्रारंभिक तपासणीमुळे आजार गंभीर होण्यापासून रोखता येतो. अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद बरे होण्याचा लाभ मिळत असल्याने हे शिबिर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

शिबिराचे स्थळ : दुरंदे हॉस्पिटल, करमाळा रोड, कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर
नोंदणी व संपर्क :
डॉ. अमोल दुरंदे – 9960455946 हॉस्पिटल संपर्क – 9960868764 / 9960583620 / 9130584181 / 9730320204

