गौंडरे येथील अमर काळे याची सैन्य दलात निवड झाल्याबद्दल युवासेनेकडुन सत्कार

केम(संजय जाधव) : गौंडरे येथील अमर देवीदास काळे याची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. अमरचे प्राथमिक शिक्षण गौंडरे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथे झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण कुर्डवाडी येथील के .एन भिसे काॅलेज येथे झाले आहे. धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सचिव हरिदास काळे यांचा तो पुतण्या आहे.

सैन्यात भरती झाल्याबद्दल आज अमर काळे यांचा धर्मवीर संभाजी विद्यालय व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाचे सैन्य भरती चे स्वप्न पुर्ण करण्यासठी पाठबळ देणारे वडिल देवीदास काळे यांचा देखील युवासेनेकडुन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे शाहुराव फरतडे ,धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सचिव हरिदास काळे ,सह सचिव उत्तम हनपूडे, भोईटे सर ,गिलबीले सर,मुळीक सर ,कोळेकर सर, जावळे सर ,निळ सर , मुळीक सर, पुराणे सर कर्मचारी सुरेश साळवे, श्रिकांत नलबे, बापू तांबोळी उपस्थित होते.


