रासप च्या "भावना गांधी" यांना काँग्रेस आणि प्रहारचा पाठींबा - नगराध्यक्षपदाची लढत अधिक रंगली.. -

रासप च्या “भावना गांधी” यांना काँग्रेस आणि प्रहारचा पाठींबा – नगराध्यक्षपदाची लढत अधिक रंगली..

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२७ : करमाळा नगरपरिषद निवडणुकीत पंचरंगी लढतीला आता आणखी दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. भावनाताई भद्रेश गांधी यांना जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच प्रहार पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला आहे. करमाळ्यातील राजकीय समीकरणांना नवा कल मिळाला आहे.

काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांनी काँग्रेसतर्फे दिलेले पाठिंब्याचे पत्र गांधी यांच्या निवडणुकीतील विश्वासार्हता वाढवणारे ठरले. त्यासोबतच प्रहार संघटनेतर्फे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, युवा अध्यक्ष विकी मोरे, तसेच तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे यांनी लेखी पाठिंबा जाहीर केला आहे. नगराध्यक्ष पद हे यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने करमाळ्यात पंचरंगी रंगतदार लढत सुरू आहे.

भाजप – सुनीता देवी, शिवसेना – नंदिनी जगताप, शहर विकास आघाडी – मोहिनी सावंत, अपक्ष – प्रियांका वाघमारे व रासप – सौ.भावना गांधी
यात काँग्रेस आणि प्रहारचा साथ लाभल्याने भावनाताई गांधी यांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे. सौ.गांधी या आपल्या कार्यकर्त्यांसह
शहरातील सर्व वॉर्डांमध्ये घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. मतदारांचा आम्हाला खुप चांगला प्रतिसाद आसल्याचे रासपचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते व प्रवक्ते ॲड.भद्रेश गांधी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!