वक्फ नोंदणीला मुदतवाढ द्यावी – हाजी कलीम काझी

करमाळा: सुधारित वक्फ कायद्यानुसार एकीकृत वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास या उद्देशाने तयार केलेल्या उम्मीद पोर्टलवर वक्फ आणि त्यांच्या मालमत्ता नोंदणीसाठी 5 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारचे उम्मीद पोर्टल सध्या संथ गतीने सुरू असून तांत्रिक अडचणी येत असल्याने पोर्टलवर वक्फ संस्थांच्या मालमत्तांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक तालुका अध्यक्ष हाजी कलीम काझी यांनी केली आहे.

उम्मीद पोर्टल संथ गतीने सुरू असल्याने महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करता येत नाही. तसेच उम्मीद पोर्टल आणि व वक्फ मालमत्तेसंबंधी मुस्लिम समाजात हवी तशी अजून जनजागृती झाली नाही त्यामुळे मे 2026 पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजुजू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी करमाळा सकल मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष जमीर सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे समीर शेख , अॅड अलिम पठाण, अॅड नईम काझी, इब्राहिम मुजावर सर, डॉ समीर बागवान, मुफ्ती अबूरेहान, मौलाना अन्वर, सुरज शेख, रमजान बेग , मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, इकबाल शेख , अरबाज बेग , कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, खलील कुरेशी, सुपरान शेख, अफजल शेख, जावेद सय्यद , अलीम पठाण, गुलाम सय्यद , शाहीद बेग, कयुम मदारी दाऊद मदारी अक्रम मदारी, अलिम शेख उपस्थित होते.


