कोर्टीत मुळव्याध उपचार शिबीरातून ४७१ रुग्णांना मदतीचा हात

0

करमाळा:परिवर्तन प्रतिष्ठान आणि डॉ. दुरंदे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, कै. संजना उध्दव तुपरे यांच्या स्मरणार्थ आयोजित मुळव्याध निदान-उपचार शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे यांनी 471 रुग्णांवर मोफत स्क्लेरोथेरपी इंजेक्शन तसेच लेझर पद्धतीद्वारे उपचार केले.

या शिबिराचे आयोजन परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. रुग्णांना रक्त तपासणी, इंजेक्शन, लेझर उपचार आणि औषधोपचार पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जि. प. सदस्य सवितादेवी राजेभोसले, जेऊर येथील सरपंच पृथ्वीराज पाटील, वकील सविता शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, राजुरी येथील सरपंच सोनाली भोसले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. प्रदीप तुपेरे, उद्धव तुपेरे, डॉ. जिनेंद्र दोभाडा, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. दिलीप कुदळे, डॉ. गणेश बंडगर, डॉ. अमित कुमार मेरगळ, डॉ. पापा मनेरी, डॉ. अभय बदे, डॉ. माऊली वाघमोडे, डॉ. आकाश पवार, डॉ. सचिन शेटे, डॉ. सुनील फाळके यांचा सहभाग होता

तसेच बाळू पारखे, एकनाथ शिंदे, हनुमंत जगताप, खंडू शिंदे, डॉ. नितीन समुद्र, डॉ. विलास सकट, आबासाहेब टापरे, मोहन मारकड (सरपंच विहाळ), भाऊ शेळके (सरपंच सावडी), मनोहर कोडलिंगे (सरपंच पोंधवडी) आदींची उपस्थिती लाभली.

शिबिरामुळे परिसरातील अनेक रुग्णांना त्वरित आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!