वांगी सोसायटीत नवे नेतृत्व -चेअरमनपदी विकास पाटील तर व्हाइस चेअरमन पदी मंगल जाधव बिनविरोध -

वांगी सोसायटीत नवे नेतृत्व –
चेअरमनपदी विकास पाटील तर व्हाइस चेअरमन पदी मंगल जाधव बिनविरोध

0

करमाळा(संदेश प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांगी बृहत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत नवे नेतृत्व निवडले गेले. चेअरमनपदी विकास नामदेव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मंगल महादेव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड प्रक्रियेदरम्यान मकाईचे संचालक युवराज रोकडे, गणेश तळेकर, मार्केट समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, माजी सदस्य बापूराव रणसिंग, आदीनाथचे संचालक दत्ताबापू देशमुख, रामेश्वर तळेकर, माजी संचालक भारतराव साळुंखे, पांडूरंग जाधव, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, सोसायटीचे माजी चेअरमन साहेबराव रोकडे, डॉ. विजय रोकडे, रविराज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच सोसायटी सदस्य नानासाहेब भानवसे, नामदेव महाडीक, बबन गोडसे, दिनकर रोकडे, नितीन देशमुख, आप्पासाहेब भोसले, उमेश पाटील, साधना मंगवडे, भैरवनाथ बंडगर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, संपत देशमुख, शिवराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य तानाजी देशमुख, नाना तकीक, शंकर जाधव, उपसरपंच डॉ. भाऊसाहेब शेळके, कृष्णा जाधव, आप्पासाहेब चौगुले, ढोकरीचे माजी उपसरपंच हिराजी चौगुले, सुनिल सांगवे, सुधीर बापू देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संजय देशमुख, वैभव पाटील, तेजस पाटील, विशाल मोरे, बाळासाहेब सर्जेराव देशमुख, बाळासाहेब रोकडे, युवा उद्योजक लक्ष्मण गोडसे, शिवराज रोकडे आदींची उपस्थिती होती.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयातील उमेश बेंढारी यांनी कामकाज पाहिले. संस्थेचे सचिव दत्तात्रय शिर्के यांनी निवडप्रक्रियेची आवश्यक नोंद आणि कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!