वांगी विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विकास पाटील बिनविरोध

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.४: वांगी येथील
तालुक्यातील सर्वात मोठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि कामकाजाच्या शिस्तीमुळे प्रसिध्द असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड नुकतीच झाली. यात चेअरमनपदी विकास नामदेव पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. मंगल महादेव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवड प्रक्रियेसाठी घेतलेल्या सभेला वांगी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मकाईचे संचालक युवराज रोकडे, गणेश तळेकर, मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, माजी सदस्य बापूराव रणसिंग, आदिनाथचे संचालक दत्ताबापू देशमुख, रामेश्वर तळेकर, माजी संचालक भारतराव साळुंखे, पांडुरंग जाधव, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन साहेबराव रोकडे, डॉ. विजय रोकडे, रविराज देशमुख, सोसायटी सदस्य नानासाहेब भानवसे, नामदेव महाडीक, बबन गोडसे, दिनकर रोकडे, नितीन देशमुख, आप्पासाहेब भोसले, उमेश पाटील, सौ. साधना मंगवडे, भैरवनाथ बंडगर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, संपत देशमुख, शिवराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य तानाजी देशमुख, नाना तकीक, शंकर जाधव, उपसरपंच डॉ. भाऊसाहेब शेळके, कृष्णा जाधव, आप्पासाहेब चौगुले, ढोकरीचे माजी उपसरपंच हिराजी चौगुले, सुनिल सांगवे, सुधीर बापू देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संजय देशमुख, वैभव पाटील, तेजस पाटील, विशाल मोरे, बाळासाहेब सर्जेराव देशमुख, बाळासाहेब रोकडे, युवा उद्योजक लक्ष्मणभाऊ गोडसे, शिवराज रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयातील श्री. उमेश बेंढारी यांनी तर संस्थेचे सचिव श्री. दत्तात्रय शिर्के यांनी कामकाज पाहिले.


