जिव्हाळा ग्रुपचा स्नेह मेळावा ७ डिसेंबरला

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील ग्राम सुधार समितीच्या मार्गदर्शनातून कार्यरत असलेल्या जिव्हाळा ग्रुप तर्फे आयोजित स्नेह मेळावा येत्या ७ डिसेंबर २०२५ रोजी रविवारी उत्साहात साजरा होणार आहे. हा मेळावा पांगरे येथील लोकविकास डेअरी, जेऊर–टेंभुर्णी हायवे, वांगी फाटा येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.
मेळाव्यात गीत, कविता, विनोद, चर्चासत्र यांसह मान्यवरांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. सर्व वयोगटांसाठी प्रेरणादायी आणि बहुरंगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिव्हाळा ग्रुपच्या महिला व पुरुष सदस्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी, असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक दीपक आबा देशमुख, (चेअरमन – लोकविकास डेअरी, पांगरे) व जिव्हाळा ग्रुप ने केले आहे.
