केम येथील मनिषा तळेकर यांचे निधन

केम (संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील रहिवासी मनिषा स्वप्निल तळेकर यांचे काल (दि. ८ डिसेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय ४० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा तसेच सासू–सासरे असा परिवार आहे.
त्या सेवानिवृत्त शिक्षक देवीदास तळेकर यांच्या सुन होत्या. स्वामी समर्थ भक्त म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने केम परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
