भगतवाडीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता.. -

भगतवाडीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता..

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.14 : करमाळा तालुक्यातील भगतवाडी येथून १३ वर्षे ११ महिने वयाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भगतवाडी येथील मुलीच्या आई ने य दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता त्या व त्यांचे पती मजुरीसाठी शेतात गेले होते. त्यावेळी घरात अल्पवयीन मुलगी वय १३ वर्षे ११ महिने व एक मुलगा होते. सायंकाळी सुमारे ७ वाजता घरी परत आल्यानंतर सदर मुलगी घरात आढळून आली नाही. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र मुलीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर अज्ञात इसमाने फूस लावून मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बेपत्ता मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :
उंची सुमारे ५ फूट, रंग गोरा, केस काळे व लांब, डोळे काळे. अंगात काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात चप्पल होती. ती मराठी भाषा स्पष्ट बोलते व समजते. शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस अधिक तपास करीत असून, सदर मुलीबाबत कोणाला माहिती असल्यास करमाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!