दहिगाव येथे शेतजमिनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३ : दहिगाव येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून झालेल्या वादातून शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दारासिंग मुरलीधर शिंदे रा. दहिगाव (ता.करमाळा) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, ५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मी शेतातील मोटार बंद करण्यासाठी गेले असता शेजारील शेतकरी सुरेश भिमराव पाटील हे गट नं. १५०/२ च्या पश्चिम सीमेवरील बांधावर असलेले आंब्याचे झाड तोडत होते. त्यांना सदरचे झाड आमच्या मालकीचे असल्याचे सांगितल्यावर सुरेश पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली.
दारासिंग शिंदे हे जन्मतः डाव्या हाताने अपंग असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.



