दारूच्या नशेत गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल..

करमाळा (संदेश प्रतिनिधी) — दारूच्या नशेत करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना मंगळवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी घडली.
यात पोलीस हवालदार मयूर गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी सुमारे २ वाजता करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात एक इसम मोठमोठ्याने बडबड करीत गोंधळ घालत होता. “माझ्याविरुद्ध तक्रार का घेतली?” असे म्हणत तो सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत असल्याने शांतता भंग होत होती. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव दिपक रावसाहेब शिंदे (वय ४५, रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर इसम दारूच्या अमलाखाली असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.




