तानाजी झोळ यांचे सरपंचपद कायम - सोलापूर जिल्हाधिकारी यांचा निर्णय -

तानाजी झोळ यांचे सरपंचपद कायम – सोलापूर जिल्हाधिकारी यांचा निर्णय

0
तानाजी झोळ

करमाळा: वाशिंबे (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी झोळ यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे. तानाजी झोळ यांच्याविरुद्ध तीन अपत्य असल्याच्या कारणावरून सरपंचपद रद्द करण्यात यावे, असा अर्ज नवनाथ झोळ यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते.

सरपंच तानाजी झोळ हे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक असून नवनाथ झोळ हे आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत.

दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ (१) (ज-१) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी आदेश पारित केला. या आदेशानुसार नवनाथ मधुकर झोळ यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला असून, त्यामुळे तानाजी झोळ यांचे सरपंचपद कायम राहिले आहे. या निर्णयाची प्रत तहसीलदार, करमाळा यांना पाठविण्यात आली आहे.

गावाच्या विकासकामांचा विजयतानाजी झोळ

वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर कोणतेही राजकारण न करता गावाच्या विकासावर भर दिला. माजी आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासालाच प्राधान्य दिल्यामुळे विरोधकांनी दाखल केलेले अपील नामंजूर झाले असून, हा विकासकामांचा विजय असल्याची प्रतिक्रिया सरपंच तानाजी झोळ यांनी व्यक्त केली.

पुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार संजय शिंदे आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक निधी मिळवून गावाच्या विकासकामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!