पराभवातूनही सुसंस्कृत विजयाची शिकवण-आगरवाल परिवाराने जपली करमाळ्याची नवी लोकशाही संस्कृती -

पराभवातूनही सुसंस्कृत विजयाची शिकवण-आगरवाल परिवाराने जपली करमाळ्याची नवी लोकशाही संस्कृती

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२७: शहरात निवडणूक निकालानंतर ज्या घरातील उमेदवार विजयी होतो, त्या घरात आनंदोत्सव साजरा होतो; मात्र ज्या घरातील उमेदवार पराभूत होतो, त्या घरात निराशेची छाया पसरलेली असते. अशा वेळी बहुतांश परिवार सार्वजनिक जीवनापासून दूर राहतात.  याला छेद देत आगरवाल परिवाराने करमाळ्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात एक नवी, प्रेरणादायी संस्कृती निर्माण केली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांचा या निवडणुकीत पराभव झाला. आपल्या मुलाचा पराभव बाजूला ठेवत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक ललीतशेठ आगरवाल यांनी विजयी नगराध्यक्ष व सर्व नूतन नगरसेवकांचा खुल्या मनाने जाहीर सत्कार केला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ सत्कार नव्हता, तर लोकशाही मूल्यांचा, राजकीय परिपक्वतेचा आणि सामाजिक सलोख्याचा जिवंत संदेश होता.

25 डिसेंबर ला सांयकाळी 7 वाजता रामभरोसे हाॅटेल मध्ये ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड. बाबूराव हिरडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत म्हणाल्या,की
“करमाळा शहरातील सर्व समस्या तातडीने सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणत्याही नागरिकाला अडचण असल्यास त्यांनी थेट माझी भेट घ्यावी. प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.”

या कार्यक्रमाला केशव प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राशीन पेठ तरुण सेवा मंडळाचे सदस्य तसेच अग्रवाल परिवारातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष सौ. मोहिनी सावंत, नूतन नगरसेवक संजय सावंत, अ‍ॅड. राहुल सावंत, नूतन नगरसेविका चैताली सावंत, सचिन घोलप, नगरसेवक प्रतिनिधी सचिन गायकवाड, विजय घोलप, महादेव अण्णा फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे, युवराज चिवटे, अतुल फंड, रोहिदास आलाट, विक्रमसिंग परदेशी, श्री. मुलानी, तुकाराम इंदलकर, सुनील लुनिया, रामभाऊ ढाणे तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आगरवाल परिवारातील ललित शेठ आगरवाल, सौ.राजमती आगरवाल, उमेश आगरवाल, सौ. राखी आगरवाल, रमेश आगरवाल, सतीश आगरवाल, श्रीकांत आगरवाल, अ‍ॅड. प्रियाल आगरवाल, शितल आगरवाल, सपना आगरवाल, स्नेहल आगरवाल, डिंपल आगरवाल, पूजा आगरवाल, दिपाली आगरवाल, पवन आगरवाल, ऋषिकेश आगरवाल, देवांश आगरवाल यांच्यासह शहरातील सर्व नूतन नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!